महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दाटले हे धुके.. उत्तर पुणे भागाला पांढऱ्या शुभ्र धुक्याची मिठी !

पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात रविवारी पांढऱ्या शुभ्र धुक्यांची लाट आल्याचे पहायला मिळाले... घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सकाळी आलेल्या या पांढऱ्या शुभ्र धुक्यांच्या लाटेने नागरिकांचे मन अधिकच प्रसन्न झाले होते...

उत्तर पुणे भागात धुक्यांची लाट

By

Published : Sep 29, 2019, 1:32 PM IST

पुणे -मागील काही दिवसांच्या पावसाच्या रपेटीनंतर रविवारी पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात वेगळेच चित्र पहायला मिळाले. पहाटेपासूनच या भागात धुके दाटुन आल्याने, येथील नागरिकांना अनेक दिवसांनंतर मन प्रसन्न करणारी सकाळ अनुभवायला मिळाली.

उत्तर पुणे भागाला पांढऱ्या शुभ्र धुक्यांची मिठी !

आज रविवारी घटस्थापना होत आहे. नवरात्रीची आज पहिलीच माळ आहे., मात्र रविवारची सकाळ पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव,खेड तालुक्यातील ग्रामीण भागात पांढऱ्या शुभ्र धुक्याने लपेटलेली पाहायला मिळाली.

हेही वाचा... 'यंदा नवरात्रोत्सवात टॅटूंची चलती, 'कलम ३७०' सह 'चांद्रयान-२' च्या टॅटूंनी वेधलं लक्ष'

गेल्याचा आठ दिवसांपासून पावसाची जोरदार बरसात होत असलेल्या या भागात रविवारी वेगळेच चित्र पहायला मिळाले. दोन दिवसांपासून पाऊस संपला आहे. पण रविवारी आलेल्या धुक्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे.

शेतपिकांवर धुक्यांमुळे रोगराई पसरण्याची शेतकऱ्यांना भिती

रविवारी आलेल्या धुक्यांमुळे या भागातील नागरिक सुखावले आहेत, मात्र सध्या पडलेल्या या पांढऱ्याशुभ्र धुक्यांमुळे रोगराई पसरण्याची भिती आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतपिकांवर या धुक्यांचा प्रादुर्भाव होण्याची भिती आहे. त्यामुळे एकीकडे या वातावरणाचा आनंद जरी पहायला मिळत असला, तरी दुसरीकडे या वातावरणाचे वाईट परिणाम पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा... 'अजित पवारांचा राजीनामा हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण'​​​​​​​

ABOUT THE AUTHOR

...view details