पुणे - महाराष्ट्रसह पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढलं आहे. शहरात दररोज दीड हजारांच्यापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळत आहेत. रविवारी दिवसभरात तब्बल 2 हजार 275 बाधित रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरात रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने यावेळेत बंद ठेवण्याचे आदेश महानगर पालिकेकडून देण्यात आले.
शहरातील बहुतांश भागात व्यापाऱ्यांनी वेळेत दुकाने बंद करून चांगला प्रतिसाद दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला. आदेशाचा भंग केल्यास दंड आकारण्यात आला. तसेच अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महानगर पालिकेकडून देण्यात आले होते.