पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखा युनिट -1 ने अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 लाख रुपये किंमतीचा 27 किलो 500 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये विक्रीला आणलेला 27 किलोचा गांजा जप्त; दोघांना अटक - PI Uttam Tangade
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरातील सर्व्हिस रोडच्या बाजूला एका झाडाखाली दोघे जण गांजा विक्रीसाठी आले असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले.
राहुल भीमराव पवार (वय- 21, रा. निगडी) आणि अमोल अशोक शिंदे (वय- 26 रा. अंकुश चौक, निगडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद जयराम लांडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरातील सर्व्हिस रोडच्या बाजूला एका झाडाखाली दोघे जण गांजा विक्रीसाठी आले असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 7 लाख रुपये किंमतीचा 27 किलो 500 ग्राम गांजा आणी दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपीनी गांजा विक्रीसाठी आल्याची कबुली पोलीसांना दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलिस कर्मचारी नितीन खेसे, गणेश सावंत यांच्या पथकाने केली आहे.