पुणे: शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण (kidnapped businessman and beaten in Pune ) केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे (gangster Gagya Marne kidnapped businessman) याच्यासह 14 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल (Police filed Mokka on 14 people) केला आहे. या गुन्ह्यात मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोक्का कारवाई करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या तपासात या टोळीने परिसरात आपले वर्चस्व निर्माण व्हावे व इतर अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा याकरिता हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. (Crime News)
कुख्यात गुंड फरार -सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (वय 43, रा. धनकवडी), हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील (वय 39, रा. बुरली, ता. पलुस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय 46, रा. कोडोवली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय 50, रा. समर्थनगर, कोडोवली, जि.सातारा), गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड टोळीप्रमुख) , रुपेश कृष्णाराव मारणे (रा.कोथरुड), संतोष शेलार (रा.कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दोपोडी), अजय गोळे (रा. नर्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, सहकारनगर, नवघणे) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. यात चौघांना अटक करण्यात आली आहे. हा घटनेनंतर गज्या मारणे व इतर फरार झाले आहे.