महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक: मतिमंद तरुणीवर चौघांचा सामूहिक बलात्कार, पोलिसांनी आवळल्या नराधमांच्या मुसक्या - बलात्कार लेटेस्ट न्यूज

पीडित मतीमंद तरुणी शुक्रवारी स्वारगेट परिसरात होती. यावेळी श्रीकांत सरोदे , आदित्य पवार, दुरवेश जाधव आणि आशिष उर्फ रड्या मोहीते या नराधमांनी तिला दत्तवाडी परिसरात जबरदस्तीने आणले. त्या ठिकाणी एका बंद खोलीत चौघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे.

Gang Physical Abuse To Mentally retarded Girl In Pune
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 28, 2021, 1:43 PM IST

पुणे - मतीमंद तरुणीच्या असहायतेचा फायदा घेत चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. ही घृणास्पद घटना पुण्यातील दत्तवाडी परिसरात घडली असून पोलिसांनी या नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. श्रीकांत सरोदे, आदित्य पवार, दुरवेश जाधव आणि आशिष उर्फ रड्या मोहिते अशी पोलिसांनी अटक केलेल्या नराधमांची नावे आहेत.

स्वारगेट परिसरातून जबरदस्तीने नेले दत्तवाडी परिसरात

पीडित मतीमंद तरुणी शुक्रवारी स्वारगेट परिसरात होती. यावेळी श्रीकांत सरोदे (वय 36), आदित्य पवार (वय 19), दुरवेश जाधव (वय 36) आणि आशिष उर्फ रड्या मोहिते (वय 18) या नराधमांनी तिला दत्तवाडी परिसरात जबरदस्तीने आणले. त्या ठिकाणी एका बंद खोलीत चौघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे. दत्तवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details