महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गणेशभक्ताकडून दगडूशेठ गणपतीला १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण - sha devotee offers 10 kg gold crown

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबाबत भक्तांना श्रद्धा आहे. देश - विदेशातील भक्त देखील बाप्पाच्या चरणी दर्शनासाठी येतात. अशाच एका भक्ताने 10 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या मुकुटावर रेखीव नक्षीकाम केले असून विविध पाचू लावण्यात आले आहे.

Dagdusheth Ganpati
Dagdusheth Ganpati

By

Published : Sep 12, 2021, 9:38 PM IST

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका गणेशभक्ताने १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण केले आहे. या मुकुटांवर विविध प्रकारचे पाचू लावण्यात आले असून रेखीव नक्षीकाम देखील करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रींना हा मुकुट घालण्यात आला आहे.या सोन्याच्या मुकुटाची किंमत सुमारे 6 कोटी रुपये इतकी सोन्याचा मुकूट बाप्पाचरणी अर्पण केलं आहे. याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.

दगडूशेठ गणपतीला १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण

भक्तांकडून 10 किलो सोन्याचे मुकुट अर्पण
कोरोनामुळे 2 वर्षापासून मंदिरे बंद ठेवण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबाबत भक्तांना श्रद्धा आहे. देश - विदेशातील भक्त देखील बाप्पाच्या चरणी दर्शनासाठी येतात. अशाच एका भक्ताने 10 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या मुकुटावर रेखीव नक्षीकाम तसेच विविध पाचू लावण्यात आले आहे.

भक्ताने ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा
दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये व आॅनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा -कन्नमवार नगरचा पुनर्विकास होऊ दे रे महाराजा...; अनोखा देखावा करून बाप्पासमोर गाऱ्हाणं

ABOUT THE AUTHOR

...view details