महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे: केसरीवाड्यामध्ये गणेशोत्सवाला उत्साहमध्ये सुरुवात; विदेशी पर्यटकांची हजेरी - ganesh festival celebration in kesari wada

लोकमान्य टिळकांनी सार्वजनीक गणेशोत्सवाची सुरुवात केल्यापासून केसरी वाड्यातील गणेशोत्सव अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. आज केसरी वाड्यात गणेशाचे आगमन झाले असून या प्रसंगी भक्तांनी गर्दी केली होती.

केसरी वाड्यातील गणपती

By

Published : Sep 2, 2019, 7:50 PM IST

Updated : Sep 2, 2019, 8:58 PM IST

पुणे - लोकमान्यांच्या केसरीवाड्यामध्ये सोमवारी सकाळी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी केसरी वाड्याचा परिसर ढोल ताश्यांच्या गजरात दुमदुमून गेला होता.

केसरीवाड्यामध्ये गणेशोत्सवाला उत्साहमध्ये सुरुवात

लोकमान्य टिळकांनी 1893 ला सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर दरवर्षी केसरी वाड्यामध्ये टिळक कुटुंबियांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यानुसार यंदाही गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. केसरी वाड्यातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभली असल्यामुळे पुण्यातील गणेश भक्तांबरोबर परदेशी पर्यटक देखील यावेळी उपस्थित होते.

Last Updated : Sep 2, 2019, 8:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details