पुणे - खडकीतील ५१२ आर्मी बेस वर्कशॅापमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. चौघे जण ठेकेदारी पद्धतीने काम करत असून रणगाड्यांसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक साहित्य चोरुन नेत असताना त्यांना पकडण्यात आले. सचिन सिद्धप्पा बनसोडे (वय ३२), आमोगसिद्ध केशव आठवले (वय ३८), विकास आदिनाथ साबळे (वय ३१, तिघे रा. पिंपळे गुरव), मोहन उत्तम रासकर (वय ४३, रा. भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आर्मी बेस वर्कशॅापमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणाऱ्या चौघांना अटक
आर्मी बेस वर्कशॅापमधून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची प्रवेशद्वारावर लष्करातील जवानांकडून तपासणी करण्यात येते. बनसोडे, आठवले, साबळे, रासकर टेम्पोतून इलेक्ट्रीक साहित्य, रशियन बनावटीचा रेडिएटर तसेच अन्य साहित्य टेम्पोतून घेऊन जात होते. प्रवेशद्वारावर टेम्पोची तपासणी करण्यात आली. तेव्हा इलेक्ट्रिक साहित्य बाहेर विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.
प्रवेशद्वारावर टेम्पोची तपासणी -लष्करातील सुभेदार बाबा बन्सीलाल (वय ४८) यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खडकीतील ५१२ आर्मी बेस वर्कशॅापमध्ये लष्करातील रणगाड्यांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम चालते. आरोपी बनसोडे, आठवले, साबळे, रासकर एका खासगी कंपनीकडून ठेकेदारी पद्धतीने आर्मी बेस वर्कशॅापमध्ये काम करत आहेत. आर्मी बेस वर्कशॅापमधून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची प्रवेशद्वारावर लष्करातील जवानांकडून तपासणी करण्यात येते. बनसोडे, आठवले, साबळे, रासकर टेम्पोतून इलेक्ट्रीक साहित्य, रशियन बनावटीचा रेडिएटर तसेच अन्य साहित्य टेम्पोतून घेऊन जात होते. प्रवेशद्वारावर टेम्पोची तपासणी करण्यात आली. तेव्हा इलेक्ट्रिक साहित्य बाहेर विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. चौघांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास करत आहेत.