पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात आणखी नवीन ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शहरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४९वर पोहोचला आहे. तर आजपर्यंत एकूण १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सध्या ३७ जणांवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आणखी 4 कोरोना पॉझिटिव्ह; एकूण आकडा ४९ - कोरोना विषाणू
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज नवीन रुग्ण आढळत असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची आणखी डोकेदुखी वाढत असल्याचे दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज नवीन रुग्ण आढळत असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची आणखी डोकेदुखी वाढत असल्याचे दिसत आहे. आज आढळलेल्या ४ रुग्णामध्ये एक १९ वर्षीय तरुण, ३१ आणि ३३ वर्षीय पुरुष तर ४२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
गुरुवारी एका ४ वर्षीय चिमुकलीला कोरोना झाल्याची गंभीर बाब उघड झाली होती. आज देखील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून यात १९ वर्षीय तरुण आणि ३१, ३३ वयाचे दोन पुरुष असून ४२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वारंवार नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले जात आहे. परंतु, काही नागरिक याचे पालन करताना दिसत नाहीत. दररोज अनेक नागरिकांवर पोलीस कारवाई करत आहेत.