पुणे- चुकीची जीवनशैली चुकीचा आहार-विहार आणि त्यामुळे मधुमेहसारखे वाढणारे आजार हे मुत्रपिंडासाठी देखील जोखमीचे घटक ठरत आहे. एकेकाळी फक्त मध्यम व वयस्कर लोकांमध्ये आढळून येणारा हा आजार आत्ता तरुणांमध्ये देखील दिसून येऊ लागला आहे. हा आजार जर दूर ठेवायचा असेल. तर आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे मत ज्येष्ठ मुत्रविकार तज्ञ व यस मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश पाटणकर यांनी व्यक्त केले.
मूत्रपिंड संदर्भातील आजार टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करा - health news
चुकीची जीवनशैली चुकीचा आहार-विहार आणि त्यामुळे मधुमेहसारखे वाढणारे आजार हे मुत्रपिंडासाठी देखील जोखमीचे घटक ठरत आहे.
मूत्रपिंड संदर्भातील आजार टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करा
गेल्या 40 वर्षांपासून मी मूत्रविकारामधील सितांत्तर पहातोय. त्यात मला भीती वाटत आहे की, अश्या पद्धतीने जर मूत्रविकाराचे रुग्ण वाढले. तर भारताच्या लोकसंख्येचा मुख्य घटक असलेल्या तरूण वर्गात मूत्रपिंडाच्या विकारांचे प्रमाण दिसून येत आहेत. किडनी खराब व रिकामी होण्याचे रुग्ण आत्ता वाढत चालले आहेत. पुर्वीच्याकाळी हेच आजार हे उतार वयाच्या लोकांमध्ये होत होते.आत्ता किडनी ट्रान्सफरमध्ये 7 वर्षाच्या मुलींपासून ते 40 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत होत आहे. आमच्या इथं किडनी ट्रान्सफरसाठी येणाऱ्या रुग्णांना 60 टक्के डायबेटीस असतो अशी माहिती यावेळी डॉ.पाटणकर यांनी यावेळी दिली.
आपण आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवं-
डायबेटीस हा आजार दोन प्रकारचा असतो. एल टाईप 1 आणि दुसरा टाईप 2, टाईप 1 हा थोडंस आनुवंशिक असतो आणि टाईप 2 हा जास्त प्रमाणात समाजात वाढत चालला आहे. काही काळाने भारत हा डायबेटीसची राजधानी होणार आहे. याचे मुख्य कारण लाईफस्टाईल.आणि याच लाईफस्टाईलमुळे सध्या मूत्रपिंडाच्या आजारात वाढ होत आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवं कोणत्या प्रकारच आहार आपण रोज घेत आहो. की ज्या आहारात कोणकोणते पदार्थ आपण घेत आहोत हे महत्त्वाचं आहे.