पुणे - लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गँगवॉरचा थरार पाहायला मिळाला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फायरिंगची घटना घडली. गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये संतोष जगताप यांचा मृत्यू झाला आहे.
गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये तिघे जण गंभीररित्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामधील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते. अप्पा लोंढे गँग आणि त्याच्या विरुद्ध असलेल्या एका टोळीमध्ये हे फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे.
दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये फायरिंग - वाळूच्या ठेकेदारीवरून गँगवॉर -
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे गँगवार भडकल्याची चर्चा सध्या आहे. भरदिवसा पुण्यातील लोणी काळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -नागपूर : पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; चौघांचा शोध सुरू
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तसेच शेजारील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील या देखील घटनास्थळी पोहचल्या आहेत. गँगवॉरमध्ये फायरिंग झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. नेमके फायरिंग कोणत्या कारणामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, वाळूची ठेकेदारी आणि इतर काही कारणामुळे तसेच पुर्ववैमनस्यातून ही फायरिंग झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे गँगवॉर घडल्याची चर्चा सध्या आहे. भरदिवसा पुण्यातील लोणी काळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोष जगताप दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनईसमोर थाबला होता. यावेळी रस्त्याच्या बाजूने आलेल्या चार ते पाच जणांनी संतोष जगताप व त्याच्या अंगरक्षकावर हत्याराने हल्ला केला. तसेच फायरिंगही केली. यात संतोष जगताप व त्याचा अंगरक्षक गंभीर जखमी झाला.
हेही वाचा -एसआरपीएफ जवानाकडून पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून गोळीबार, एक जण ठार
- हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू -
या हल्ल्यानंतर संतोष जगताप याला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
- संतोष जगतापवर दोन खुनाचे आरोप -
राहू येथे बेकायदा वाळू उपशावरुन २०११ मध्ये तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत बंधू रमेश सोनवणे यांच्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप संतोष जगताप याच्यावर आहे. या प्रकरणात जामिनावर संतोष जगताप बाहेर होता.