पुणे - हडपसर परिसरात एका प्रिंटींग प्रेसला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. मागील एक तासापासून सुरू असलेल्या या आगीत लाखो रुपयांचा माल खाक झाला आहे. अग्निशमन दलाचा पाच गाड्या आणि पाण्याच्या टँकरद्वारे तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुण्यात प्रिंटींग प्रेसला आग...अग्निशमनच्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात - fire broke out in pune
हडपसर परिसरात एका प्रिंटींग प्रेसला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. मागील एक तासापासून सुरू असलेल्या या आगीत लाखो रुपयांचा माल खाक झाला आहे. अग्निशमन दलाचा पाच गाड्या आणि पाण्याच्या टँकरद्वारे तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हडपसर गावातील राम मंदिर जवळ संबंधित प्रिंटींग प्रेस आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास या प्रेसमध्ये आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण प्रेसमध्ये आग लागली. यामध्ये कागद आणि पुठ्ठे असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांना आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. या गाड्या घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच चारही बाजूने आगीचे लोट बाहेर येत होते.
अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.