पुणे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात १२ वी आणि माध्यामिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात १० वी च्या लेखी परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.
या तारखेला होणार परीक्षा
१२ वी ची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहेत. तर, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हेही वाचा -मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या निवडीचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने नाकारला
नऊ विभागांमध्ये होणार परीक्षा
यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उदभवलेल्या परिस्थितीमुळे मंडळाच्या नेहमीच्या कालावधीमध्ये परीक्षा आयोजित न करता सरकारच्या मान्यतेने या परीक्षा घेण्यात येत आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेतील लेखी परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये आयोजित करण्यात आली आहे, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना कळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा -भारताच्या वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती