महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चाकूने भोसकून पत्नीचा खून केल्याची पतीची माहिती, घटनास्थळावर पोलिसांची 'अशी' झाली फजिती - Sudam Pintu Torad

एका व्यक्तीने मी पत्नीचा चाकू भोसकून खून केला आहे, अशी धावत येऊन पिंपरी पोलीस ठाण्यात माहिती दिली. मात्र, पोलिसांनी तपास केल्यानंतर हा व्यक्ती वेडसर असल्याचे समोर आले तसेच त्याने पत्नीचा खून केला नसल्याचे समोर आले.

घटनेचा तपास करताना पोलीस अधिकारी

By

Published : Jul 4, 2019, 6:35 PM IST

पुणे - पिंपरी पोलिसांची फजिती झाल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. एका व्यक्तीने मी पत्नीचा चाकू भोसकून खून केला आहे, अशी धावत येऊन पिंपरी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर व्यक्तीच्या सांगण्यावरुन पोलीस त्याच्या घरी गेले. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर व्यक्तीची पत्नी घरात झाडू मारत होती. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर पती वेडसर असल्याचे पत्नीकडून सांगण्यात आले. तेव्हा कुठे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी

पोलीस ठाण्यात खोटी माहिती देणाऱ्या वेडसर व्यक्तीचे नाव सुदाम उर्फ पिंटू तोरड (४०) असे आहे. तर ललिता सुदाम तोरड (३५, रा.आनंदनगर चिंचवड) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेडसर सुदाम उर्फ पिंटू तोरड हा पिंपरी पोलीस ठाण्यात धावत गेला, मी माझ्या पत्नीचा चाकू भोकसून खून केला आहे, अशी माहिती त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात दिली. पोलीस अधिकारी देखील गंभीर झाले. त्यांनी तत्काळ सुदामला ताब्यात घेतले आणि खून कुठे केला असे विचारले. त्याने आनंदनगर चिंचवड येथे राहत असल्याचे सांगितले. ती हद्द चिंचवड पोलिसांची असल्याने त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना फोनकरुन सविस्तर माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी पिंपरी पोलीस ठाण्यात येऊन सुदामला ताब्यात घेतले आणि आनंदनगर येथील घटनास्थळी घेऊन गेले.

वरिष्ठ पोलीस आणि गुन्हे पोलीस अधिकारी खुळे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. चिंचोळ्या गल्लीतून वाट काढत त्याने घर दाखवले आणि घरात चक्क ज्या पत्नीचा खून केला, अशी कबुली दिली तीच समक्ष उभी होती. अहो साहेब तो वेडसर आहे, महिन्यातून एखाद्या वेळेस तो तसा करतो असे पत्नीने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. पोलिसांनी ही शेजारी विचारणा करुन तेथून निघून जाणे पसंत केले. दरम्यान, या घटनेमुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. खून झाला नसल्याने पोलिसांनी ही सुटकेचा निःश्वास सोडला.

ABOUT THE AUTHOR

...view details