पिंपरी चिंचवड (पुणे) - सन 2022 पर्यंत "सर्वांसाठी घरे" हे उद्देश साध्य करण्यासाठी भारत सरकारतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने चऱ्होली, रावेत आणि बोऱ्हाडेवाडी येथे स्वस्तदरात उत्तम प्रतीची घरे उभारण्यात येत आहेत. या योजनेसाठी अर्ज स्वीकृती सुरू असून बँकांना सलग सुट्ट्या असल्यामुळे 10 ऑक्टोबरपर्यंत या योजनेला मुदत वाढ देण्यात आली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्ज स्वीकृतीसाठी 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या अभियानाचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील (इडब्ल्यूएस) नागरिकांसाठी परवडेल अशा घरांची निर्मिती केली आहे. यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांकडून अर्ज भरले जात असून या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता 2 ऑक्टोबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती; परंतु बँकांच्या सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे ही मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या अभियानाचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील (इडब्ल्यूएस) नागरिकांसाठी परवडेल अशा घरांची निर्मिती केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांकडून अर्ज भरले जात आहे. या योजनेसाठी अर्ज स्वीकृतीकरिता 2 ऑक्टोबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती; परंतु यासाठी पाच हजार रुपयांचा डीडी आवश्यक असल्याने बँकांच्या सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे डीडी वेळेत मिळणे अवघड होत आहे. तसेच, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्याने नागरिकांच्या व विविध संघटनांच्या मागणीनुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्ज स्वीकृतीची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात असलेले नागरिक लॉटरी आधारित प्रणालीमार्फत बाजारपेठेतील किमतीपेक्षा कमी किमतीत 1 बीएचके सदनिका या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे, असेही महापौरांनी सांगितले.