महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

VIDEO : जाणून घ्या जमावबंदी अन् संचारबंदीत काय आहे फरक . . . . . - राजेंद्र भामरे

कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र संचारबंदी आणि जमावबंदी याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. नागरिकांचा संभ्रम दूर करण्यासाठी पुण्यातील माजी पोलीस अधिकारी राजेंद्र भामरे यांनी सखोल माहिती दिली आहे. त्यांनी दिलेली माहिती खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही येथे देत आहोत.

Police
माजी पोलीस अधिकारी राजेंद्र भामरे

By

Published : Mar 25, 2020, 10:27 AM IST

पुणे - राज्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने संचारबंदी लागू केली. मात्र पुण्यासह अनेक ठिकाणी नागरिक घराबाहेर पडत आहेत. मात्र संचारबंदी किंवा जमावबंदी म्हणजे काय ? यात काय शिक्षा होऊ शकते याबाबत माजी पोलीस अधिकारी राजेंद्र भामरे यांनी माहिती दिली.

माजी पोलीस अधिकारी राजेंद्र भामरे
संचारबंदीत आणि जमावबंदीत फरक आहे. जमावबंदी चार माणसं फिरू शकतात, पण संचारबंदीत एकही माणूस बाहेर पडू शकत नाही. जर कुणी बाहेर निघाले, तर त्याच्यावर कलम 188 प्रमाणे कारवाई होऊ शकते. त्याला शिक्षाही होऊ शकते, म्हणून सर्वसामान्य नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन माजी पोलिस अधिकारी राजेंद्र भामरे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details