पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपासून लसीकरण आणि बुस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार देशात 18 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. (Booster Doses For Frontline Workers, Seniors Begin Today) तसेच, (दि. 10 जानेवारी) (Booster Dose Started In Pune) आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंन्टलाइन वर्कस आणि ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यासही सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातही मोठ्या प्रमाणात बुस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी आढावा घेतला आहे.
नेहरू रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांची बूस्टर डोससाठी सकाळपासून गर्दी
सध्या देशभरात लसीकरण मोठ्या वेगाने सुरू आहे. (Narendra Modi) सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहे. तसेच, अनेक देशात बुस्टर डोसही देण्यात येत आहे. (Vaccination In Pune) आता भारतातही आजपासून बुस्टर डोस देण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी फ्रंन्टलाइन वर्कर यांच्यासह 60 वर्षावरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. पुणे शहरात आज पासून बूस्टर डोसला सुरुवात झालेली आहे. शहरातील 179 केंद्रावर प्रत्येकी दीडशे त्यातही 25% ऑनलाइन तर 25 टक्के ऑफलाइन अशा पद्धतीने बूस्टर डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. शहरातील कमला नेहरू रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.
शहरात 179 केंद्रावर सुरू आहे लसीकरण