पिंपरी-चिंचवड (पुणे) - सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शतपावली करत असणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला दोन अज्ञात व्यक्तींनी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले. यावेळी चोरट्यांनी गळ्यातील 50 हजार रुपयांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली,अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे. मात्र, सदर प्रकरणामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चभ्रू पिंपळे सौदागर येथे तक्रारदार राहात असून ते सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास ते जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. गोविंद गार्डनजवळ शतपावली करत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना पिस्तूलाचा धाक दाखवून गळ्यातील मौल्यवान सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला आहे. या प्रकरणी सॉफ्टवेअर इंजिनिअर जसवंत कुमार अगरवाल यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुळीग हे करत आहेत.
पिस्तुलाचा धाक दाखवून सॉफ्टवेअर इंजिनिअरला लुटले; परिसरात दहशतीचे वातावरण
शनिवारी संध्याकाळी शतपावली करायला बाहेर पडलेल्या एक सॉफ्टवेअर इंजिनिअरला दोन अज्ञात व्यक्तींनी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले आहे. प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
सांगवी पोलीस