पुणे - अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांच्या अखत्यारित येणाऱ्या वक्फ बोर्डमागे ईडीचा ससेमिरा लागला असून वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याप्रकरणी (Waqf Board land scam case) पुणे येथे सात ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली आहे. याबाबत नवाब मलिक हे स्पष्टीकरण देताना 'ईटीव्ही भारत' म्हणाले, जमीनीच्या व्यवहारात माझा वैयक्तिक काहीच संबंध नाही. याला तत्कालिक अध्यक्ष किंवा अल्पसंख्यांक मंत्री होते त्यांच्या कार्यकाळात हा घोटाळा झाला आहे.
काय आहे प्रकरण..?
वक्फ बोर्डाच्या मालकीची हिंजवडी आयटी पार्कजवळ असलेली चार हेक्टर जागा दुसऱ्या एका ट्रस्टची असल्याचे दाखवण्यात आले आणि या ट्रस्टकडून ही जागा शासनाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अधिग्रहित केली. यासाठी शासनाने नऊ कोटी साठ लाख रुपये त्या ट्रस्टला दिले.
वक्फ बोर्डच्या सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सही शिक्क्याने या जागेसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. वक्फ बोर्डच्या मालकीच्या जागेसाठी इतर ट्रस्टला पैसे देण्यात आले, ही बाब आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर याबाबत तक्रार करण्याच्या सूचना दिल्यानंतर आम्ही तीन नोव्हेंबरला ईडीकडे याबाबत तक्रार दिली, अशी माहिती तक्रारदार मुश्ताक अहमद शेख यांनी दिली.
हे ही वाचा -ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? नवाब मलिकांचा सवाल