महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र .. ज्येष्ठ नागरिक अन् दिव्यांग व्यक्तींना गाडीत बसून लस - पुणे लसीकरण

जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी पुणे महापालिका प्रयत्न करत आहे. शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस घेताना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, त्यांना रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी पुणे महानगरपालिकेने हडपसर येथील तुपे नाट्यगृहात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू केले आहे.

Drive in Vaccination Center in Pune
Drive in Vaccination Center in Pune

By

Published : Jun 8, 2021, 7:34 PM IST

Updated : Jun 8, 2021, 7:49 PM IST

पुणे -जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी पुणे महापालिका प्रयत्न करत आहे. शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस घेताना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, त्यांना रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी पुणे महानगरपालिकेने हडपसर येथील तुपे नाट्यगृहात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू केले आहे. या लसीकरण केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना गाडीत बसूनच लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारचे पुण्यातील पहिलेच लसीकरण केंद्र आहे.

पुण्यात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र
जास्तीत जास्त पुणेकरांचे लसीकरण करण्यात यावे, यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने शहरात दीडशेहून अधिक लसीकरण केंद्र उभारली आहेत. सद्यस्थितीत लसीचा पुरवठा कमी होत असल्यामुळे लसीकरण मोहिमेत अनेक अडथळे येत आहेत. लसीचा पुरवठा झाल्यानंतर लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढत आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याशिवाय केंद्रावरील गर्दीमुळे त्यांना कोरोना होण्याचाही धोका असतो. हीच बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने ड्राइव्ह इन कोरोना लसीकरण केंद्र उभारले आहे. हडपसर येथील विठ्ठल राव तुपे नाट्यगृहातील वाहनतळामध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या लसीकरण केंद्राला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मधील पाच दिवसात जवळपास तीनशेहून अधिक ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना लस देण्यात आली आहे, अशी माहिती लसीकरण केंद्रावरील आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहल काळे यांनी दिली.
Last Updated : Jun 8, 2021, 7:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details