पुणे -पिंपरी-चिंचवड शहरात एक दुर्दैवी घटना घडली. हॉटेल समोर सतत कुत्रा येत असल्याने त्याला कामगाराने चाकूने भोकसून ठार केले आहे. याप्रकरणी प्राणी बचाव समितीच्या सदस्या प्राजक्ता कुणाल सिंग (३२, रा.वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रिपन सबुर एस.के (२३) याला अटक केली.
धक्कादायक! हॉटेल समोर कुत्रा बसत असल्याने चाकू भोकसून केले ठार - Ripon Sabur S K
हॉटेल समोर दररोज कुत्रा येत असल्याने त्याचा राग मनात धरुन आरोपी रिपनने सोमवारी रात्री उशिरा कुत्र्याला पकडून चाकूने भोकसले.
आरोपी रिपन हा मुडीफुड हॉटेलमध्ये कामाला आहे. याठिकाणी हा कुत्रा सतत येत होता. तसेच तक्रारदार प्राजक्ता शेजारीच रहात असल्याने भटक्या कुत्र्यांना अन्न टाकत होत्या. त्यामुळे तेथे अनेक कुत्री येत असत. हा कुत्रा देखील हॉटेल समोर दररोज येत असल्याने त्याचा राग मनात धरुन आरोपी रिपनने सोमवारी रात्री उशिरा कुत्र्याला पकडून चाकूने भोकसले, यात तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार तक्रारदाराने प्रत्यक्षात पाहिला. त्यानंतर त्यांनी कुत्र्याला तातडीने औंध येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेले. मात्र, तोपर्यंत कुत्र्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्राजक्ता यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनीही तक्रारीची नोंद घेऊन रिपनला अटक केली