महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मोदकांनी सजले मिठाईचे दुकानं, ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट

गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारच्या मिठाया बघायला मिळत आहेत. आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी बाप्पाच्या लाडक्या आवडत्या मिठाईसाठी बाजारपेठा आता सज्ज झालेल्या आहेत. याबाबत आमच्या प्रतिनिधी प्रतिक्षा काटे यांनी मोदकाचे प्रकार, आणि कशा पद्धतीचे मोदक आहेत याविषयी काका हलवाई मिठाईच्या सदस्य सानिका घोटसकर यांच्याशी बातचीत केली आहे.

मोदकांनी सजले मिठाईचे दुकानं, ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट
मोदकांनी सजले मिठाईचे दुकानं, ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट

By

Published : Sep 10, 2021, 1:49 AM IST

Updated : Sep 18, 2021, 4:14 PM IST

पुणे - गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारच्या मिठाया बघायला मिळत आहेत. तसेच, मोदकांचे विविध प्रकार लाडवांचे विविध प्रकार मिठाई बघायला मिळत आहेत. आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी बाप्पाच्या लाडक्या आवडत्या मिठाईसाठी बाजारपेठा आता सज्ज झालेल्या आहेत. आणि नागरीक मिठाई घेण्यासाठी गर्दी करत आहेत. याबाबत आमच्या प्रतिनिधी प्रतिक्षा काटे यांनी मोदकाचे प्रकार, आणि कशा पद्धतीचे मोदक आहेत याविषयी काका हलवाई मिठाईच्या सदस्य सानिका घोटसकर यांच्याशी बातचीत केली आहे.

मोदकांनी सजले मिठाईचे दुकानं, ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट

विविध प्रकारचे मोदक येथे आहेत

बाजारात मिठाईचे दुकान विविध मोदकांच्या प्रकाराने विविध मिठाईने आपल्याला साजलेल्या दिसत आहेत. काजू मिठाईचे विविध प्रकार, काजू रोल स्ट्रॉबेरी मोदक अशा विविध प्रकारचे मोदक येथे आहेत. तसेच, मावा मोदक अंबा मोदक, चॉकलेट मोदक, उकडीचे मोदक अशा अनेक प्रकारचे मोदक सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

लॉकडाउनबाबतचे नियम काही प्रमाणात शिथिल झाल्याने बाजारात गर्दी

मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि लॉकडाउनमुळे मिठाई कमी प्रमाणात तयार केली. त्यामुळे त्याची विक्रीही खूप कमी प्रमाणात झाली. मात्र, यावर्षी कोरोनावर लस आल्यामुळे आणि कोरोना लॉकडाउनबाबतचे नियम काही प्रमाणात शिथिल केल्यामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात मिठाई तयार करण्यात आली आहे. तसेच, मिठाई खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सानिया यांनी यावेळी बोलताना सांगितले.

बाजारात वेगवेगळ्या मोदकांचे काय भाव आहेत?

  • काजू मोदक 1000 ,kg
  • काजू मावा मोदक 500 kg
  • काजू कोकोनट मोदक 1000kg
  • मावा चॉकलेट मोदक 1000kg
  • पंचखाद्य मोदक1000kg
  • व्हाईट चॉकलेट मोदक 1200kg
  • मलाई पेढा मोदक 600kg
  • स्ट्रॉबेरी चॉकलेट मोदक 1200kg
  • मॅंगो चॉकलेट मोदक 1200kg
  • आंबा मोदक 600kg
  • मॅंगो मलाई मोदक 600kg
  • काजू मोदक 250 पॅकेट

असे वेगवेळ्या मोदकांचे सध्या बाजारात भाव आहेत.

Last Updated : Sep 18, 2021, 4:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details