महाराष्ट्र

maharashtra

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींचे नेतृत्व करावे- छगन भुजबळ

By

Published : Jun 26, 2021, 5:22 PM IST

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व स्वीकारावे असे खुले आव्हान राज्यमंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी दिले आहे. लोणावळ्यातील चिंतन बैठकीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.

'फडणवीस यांनी ओबीसींचे नेतृत्व करावे'
'फडणवीस यांनी ओबीसींचे नेतृत्व करावे'

पुणे/लोणावळा -माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व स्वीकारावे असे खुले आव्हान राज्यमंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी दिले आहे. लोणावळ्यातील चिंतन बैठकीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. या बैठकीला मंत्री विजय वडेट्टीवार, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थितीत होते.

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींचे नेतृत्व करावे- छगन भुजबळ

'आता सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ'

भुजबळांनी थेट फडणवीसांना ओबीसी समाजाचे नेतृत्त्व करावे अशी ऑफर देतानाच त्यांनी केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा, असे ही स्पष्टपणे सांगितले आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपाकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान विरोधीपक्ष नेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेले, असा घणाघाती हल्लाबोल केला होता. त्यानंतर भुजबळ यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व स्वीकारावे असे खुले आव्हान दिले आहे. तर, विरोधकांनी एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा आता सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ, असे आवाहन काँग्रेस नेते मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

हेही वाचा -कोरोनाचे नियम पायदळी तुडवत भाजपाचे आंदोलन, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात

ABOUT THE AUTHOR

...view details