महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rajesh Tope : 'आरोग्य भरतीच्या गट ड चा पेपर लवकरच पण...'; आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

त्यामुळे गट ड ची परीक्षा पुन्हा होणारच आहे. मात्र, गट क च्या बाबतीत पुणे पोलीस तपास करायचा आहे, असे सांगत आहेत. म्हणून संभ्रमाअवस्था निर्माण झाली आहे, असे मतही राजेश टोपेंनी व्यक्त केले ( Health Group D Exam Again Rajesh Tope ) आहे.

rajesh tope
rajesh tope

By

Published : May 13, 2022, 5:58 PM IST

पुणे -आरोग्य विभागाच्या गट क आणि ड ची परीक्षा लवकरात लवकर रद्द करुन पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. त्यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकांनाही असे वाटू नये की कुठेही काहीतरी चुकीच्या मार्गाने निवड झाली आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षा घ्यावी, असे मत राज्यातील प्रमुखांचे झाले आहे. गट ड चा पेपर व्हायरल झाला होता. तो पेपर किती व्हायरल झाला असेल याची कल्पनाच न केलेल बरी. त्यामुळे गट ड ची परीक्षा पुन्हा होणारच आहे. मात्र, गट क च्या बाबतीत पुणे पोलीस तपास करायचा आहे, असे सांगत आहेत. म्हणून संभ्रमाअवस्था निर्माण झाली आहे, असे मतही राजेश टोपेंनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत ( Health Group D Exam Again Rajesh Tope ) होते.

त्या विद्यार्थ्यांची पैसे न घेता परीक्षा - राजेश टोपे म्हणाले की, गट क चा पेपर हा काही लोकांपर्यंतच व्हायरल झाला आहे. याच्या परीक्षा या दोन सत्रात झाल्या आणि यातील 60 मार्कच जो जनरल नॉलेजचा प्रश्न होते ते कॉमन होते. यामुळेच स्थगिती देण्यात आली होती. पण, आता गट ड ची परीक्षा ही लवकरात लवकर होणार आहे. टाटा आणि एमकेसीएल या कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घ्यावी, असा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. तसा जीआर देखील निघणार आहे. तसेच, त्या विद्यार्थ्यांचे पैसे न घेता परीक्षा घेतली जाणार आहे.

राजेश टोपे प्रसारमाध्यमांशी बोलताना

हे फार भीतीदायक नाही -राज्यात रोज 100 ते 15 रुग्ण आढळून येत आहे, त्यावर टोपे यांनी सांगितले की, आज जे शंभर सव्वाशे संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे. हे फार भीतीदायक नाहीये. काहीच घाबरून जाण्याचा कारण नाही. सध्या माईल्ड स्वरूपाचा आजार आहे. याचा मोठा परिणाम होणार नाही. आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत.

लवकरच कारवाई होईल - किडनी रॅकेटबाबत विचारले असता ते राजेश टोपे यांनी म्हटले, पुण्यातील किडनी रॅकेट संदर्भात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आमच्या कडे त्यांची सुनावणी सुरू आहे. आणखी आठ दिवस लागतील. सगळ्या बाजूंची माहिती घेऊन योग्य तो निकाल दिला जाईल. गुन्हा दाखल झाला आहे. लवकरच कारवाई होईल, असेही राजेश टोपेंनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -Mns Vs Shivsena : 'अटी शर्ती फक्त राज ठाकरेंसाठीच का?', मुख्यमंत्र्यांच्या सभेवरुन मनसेचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details