पुणे -पुणे रेल्वे स्थानकावर आज (शुक्रवारी) सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी 9.30 च्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर डेमु रेल्वे रुळावरून घसरली आहे. मात्र यात कुठल्याच प्रकारची हानी झाली नाही.
शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास डेमु रेल्वे ही यार्ड मधून प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर जाताना ही घटना घडली आहे. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी हजर असून, रेल्वे परत रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे सारं सुरळीत व्हायला आणखीन एक ते दीड तास लागणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही घटना घडल्यानंतर रेल्वे वाहतुकीवर मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही.
Pune Demu Derailed : पुणे रेल्वे स्थानकावर डेमू रेल्वे रुळावरून घसरली - pune railway demu derailed
शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास डेमु रेल्वे ही यार्ड मधून ( Pune Demu Derailed ) प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर जाताना रूळावरून घसरली. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी हजर असून, रेल्वे परत रुळावर आणण्याचे काम सुरू आहे.
pune demu derailed