पुणे -पुणे शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू असून 2 एप्रिलला याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्या बैठकीनंतर ते बोलत होते. पुणे शहरात तसेच राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. नागरिकांमध्ये कोरोनाची भीतीच राहिलेली नाही. त्यामुळे कोरोना नियमाचे पालन होत नाही, असे अजित पवार म्हणाले.
पुण्यातील लॉकडाऊनबाबत 2 एप्रिलला होणार निर्णय - corona update news
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्या बैठकीनंतर ते बोलत होते. पुणे शहरात तसेच राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. नागरिकांमध्ये कोरोनाची भीतीच राहिलेली नाही. त्यामुळे कोरोना नियमाचे पालन होत नाही, असे अजित पवार म्हणाले.
पुण्यातील लॉकडाऊनबाबत 2 एप्रिलला होणार निर्णय
मात्र परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. जर येत्या 5 ते 6 दिवसात परिस्थिती अशीच राहिली. तर 2 एप्रिल पर्यंत इच्छा नसतांना कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे काळजी घ्यावी, अशी जनतेला कळकळीची विनंती आहे, असे अजित पवार म्हणाले. पुणे जिल्ह्यात 50 टक्के खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
लसीकरण केंद्र वाढवणार-
तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भाग मिळून सध्या 316 लसीकरण केंद्रे आहेत. ही लसीकरण केंद्र दुप्पट करण्याचे प्रयत्न असल्याचे आमचे प्रयत्न आहेत. केंद्र सरकार आता जेवढी लस देते आहे. तेवढी लस कमी पडू शकते. त्यामुळे लस वाढवून द्यावी यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क केला असल्याचे अजित पवारांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात लग्न समारंभासाठी 50 तर अंत्यविधी साठी 20 लोक उपस्थित राहतील हा नियम आहेच. तसेच सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी कुठले ही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले.
शाळा महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद-
शहरातील शाळा आणि महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. सार्वजनिक वाहतूक सध्या सुरू राहील. तसेच दुकाने, मॉल, थिएटर याबाबत आधीच्या नियमानुसार कारवाई सुरू राहील, असे अजित पवार म्हणाले. पुढच्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णासाठी अधिकच्या ऑक्सिजनची गरज लागू शकते. यासाठी चाकण आणि रायगड मधील ऑक्सिजन उत्पादकांशी बोलणे झालेले आहे. तसेच पिपरी चिंचवड मधील जम्बो कोविड रुग्णालय 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे. कोविड सेंटरची देखील क्षमता वाढवत नेणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
Last Updated : Mar 26, 2021, 3:34 PM IST