महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pimpri Chinchwad Murder: स्वयंपाक करण्यावरुन झालेल्या वादात सुनेने केला सासुचा खून - सुनेला चाकण पोलिसांनी अटक केली

पिंपरी-चिंचवड येथे (Pimpri Chinchwad Murder) स्वयंपाक बनवण्याच्या कारणावरून सासु-सुनेच्या झालेल्या वादात, सुनेने सासुचा खून (Daughter in law killed mother in law) केल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे. सुनेला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुषमा मुळे असे खून झालेल्या महिलेचे नावआहे. सुन सुवर्णा मुळे ला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

Pimpri Chinchwad Murder
पिंपरी-चिंचवड खून

By

Published : Jul 16, 2022, 1:46 PM IST

पिंपरी-चिंचवड: (Pimpri Chinchwad Murder) स्वयंपाक बनवण्याच्या कारणावरून सुनेने सासुचा खून (Daughter in law killed mother in law) केल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे. सुनेला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुषमा मुळे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सून सुवर्णा मुळे ला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. सासु- सुनेत नेहमी वाद व्हायचे, असे पोलिसांनी सांगितले आहे. सासु ला फिट येऊन ती बेशुद्ध पडल्याच सांगण्यात आले होते. मात्र शवविच्छेदन अहवालात सुनेच बिंग फुटलं.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळे यांचं संयुक्त कुटुंब आहे. सासु, सुन आणि मुलगा मयंत हे तीघे राहात होते. सुषमा आणि सुन सुवर्णा यांच्यात किरकोळ कारणावरून दररोज भांडण व्हायचं. सासु आणि सुन या दोघीच घरी होत्या. सुवर्णा चा पती कामावर गेला, तेव्हा रात्री स्वयंपाक बनवण्याचा कारणावरून दोघींमध्ये वाद झाला. दरम्यान सुवर्णा ने सासु सुषमा चा नायलॉन दोरी ने गळा आवळून खून केला. सुषमा बेशुद्ध पडल्याच पाहून, सुवर्णाने पतीला फोन करून बोलावून घेतलं. 'सासु बाई फिट येऊन पडल्या आहेत',असे यावेळी सुवर्णाने पतीला कळवले. सुषमा यांचा मुलगा तातडीने आला, त्याने बेशुद्ध असलेल्या आई सुषमा ला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी चाकण पोलिसांना याची माहिती दिली. सुनेकडे विचारपूस केली असता, त्या फिट येऊन पडल्याच तीने सांगितलं. परंतु, शवविच्छेदन अहवालात सुषमाचा गळा दाबून खून झाल्याचं उघड झाले. पोलिसांनी अधिक विचारपूस केल्यानंतर सुनेने गुन्हा कबुल केला. त्यानंतर सुनेला चाकण पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा:Pune Crime : टिळक रोडवर तरुणांचा राडा; 6 ते 7 जणांच्या टोळक्याने केला तरुणावर वार

ABOUT THE AUTHOR

...view details