पुणे- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आजपासून राज्य शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. पुण्यात सायंकाळी सहा वाजल्यापासून या संचारबंदीला सुरुवात झाली आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पुणे पोलीस देखील सज्ज झाले आहे. पुणे शहरात 90हून अधिक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. मुख्य रस्त्यावर बॅरिकेड्स लावून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. जंगली महाराज रस्त्यावरून त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण शिंदे यांनी...
संचारबंदी अंमलबजावणी सुरू