पुणे -कुटुंबीयांकडून प्रेमसंबंधाला विरोध होण्याच्या भीतीने प्रेमी युगुलाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला असून, तरुण मात्र वाचला आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणीच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
दोघांनीही घेतले होते विष
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची मुलगी एका कंपनीत कामाला होती. त्या ठिकाणी तिचे एका तरुणासोबत प्रेम संबंध निर्माण झाले. कालांतराने या तरुणाने नोकरी सोडून दुसरीकडे कामाला लागला. तरीही त्यांच्यात प्रेम कायम होते. परंतु घरच्यांकडून आपल्या प्रेम संबंधाला विरोध होईल अशी भीती त्या तरुणाच्या मनात होती. त्यामुळे 4 डिसेंबर रोजी दोघांनी एकत्र मिळून विष प्राशन केले. दरम्यान, त्रास होऊ लागल्यामुळे संबंधित तरुणाने आपल्या नातेवाईकांना याची माहिती. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही रुग्णालयात दाखल केले.