पुणे - राज्यासह पुणे शहरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बसल्याचा पाहायला मिळत आहे. दिवसंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यातील डॉक्टर, नर्स आणि पोलीस यांना देखील या तिसऱ्या लाटेचा फटका बसला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयालातील डॉक्टर्स आणि नर्ससह एकूण 284 जण पॉझिटिव्ह ( Coronavirus Infection in Sassoon Hospital ) आढळून आले आहेत.
रुग्णालय प्रशासनावर मोठा ताण -
गेल्या 24 तासात 26 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालय प्रशासनावर मोठा ताण आल्याचे दिसून येत आहे. यापैकी अधिकाधिक रुग्णांना कोणतीही लक्षणे नसलेले आहेत. तरी ससून रुग्णालयातील विविध विभागांमध्ये कर्मचारी कमी पडत आहेत. पुणे जिल्ह्यातील ससून रुग्णालय हे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तसेच गरिबांच्या उपचारासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.