महाराष्ट्र

maharashtra

'शासनाकडून लावण्यात आलेल्या नियमांचे पालन करून लवकरच कोरोनाला हद्दपार करू'

By

Published : Mar 12, 2021, 8:21 PM IST

Updated : Mar 12, 2021, 8:40 PM IST

आत्ताही शासनाकडून लावण्यात आलेल्या नियमांचे करू आणि लवकरच कोरोनाला हद्दपार करू, असे पुणेकर नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

corona in pune
corona in pune

पुणे - पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मध्यंतरी पुण्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली होती, मात्र आता पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. प्रशासनाकडून लावण्यात आलेले निर्बंध योग्य असून पूर्वी अनेक नियमांचे पालन करत होतो. मात्र आत्ताही शासनाकडून लावण्यात आलेल्या नियमांचे करू आणि लवकरच कोरोनाला हद्दपार करू, असे पुणेकर नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

'पीएमपीएमएलवर निर्बंध लावावे'

शासनाने पीएमपीएमएलवर निर्बंध लावावे, पुणे शहरातील बाजारपेठांमध्ये दुकानदारांकडून सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. काही नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. मात्र काही नागरिकांकडून नियमांचे पालन करण्यात येत आहे. बाजारपेठांमध्ये नागरिक खबरदारी म्हणून मास्क लावतात मात्र प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे तिथे नियमांचे पालन केले जात नाही.

Last Updated : Mar 12, 2021, 8:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details