महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिलासादायक - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या प्रमाणाला ब्रेक

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्यावाढीला ब्रेक लागला आहे. तर, दुसरीकडे दिवसभरात शहरातील 9 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 7 अशा एकूण 16 रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका
पिंपरी-चिंचवड महापालिका

By

Published : Oct 13, 2020, 2:19 AM IST

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ओसरत असल्याचे चित्र आहे. शहरात दिवसभरात 246 आणि महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील 6 अशा 252 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 16 जनांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 84 हजार 31 वर पोहचली आहे. त्याचबरोबर 609 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सुट्टी देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्यावाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शहरात आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तर, दुसरीकडे मृत्यूचा आकडा कमी होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाला चिंता सतावत आहे. मृत्यू दर कमी करण्याचे मोठे आव्हान महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे. मात्र, रुग्ण संख्या ओसरत असल्याने काही प्रमाणात पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळाला आहे.

दिवसभरात शहरातील 9 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 7 अशा एकूण 16 रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात भोसरी, मोशी, चिंचवड, पिंपळेगुरव, अजमेरा, घरकूल, तळेगाव दाभाडे, पिंपळगाव, शिरूर, चाकण, बदलापूर, देहूगाव, खेड येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 84 हजार 31 कोरोना बाधित रुग्णांपैकी 78 हजार 58 जण ठणठणीत बरे झाले आहेत. तर, शहरातील 1 हजार 441 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 554 असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details