महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे विभागात 383 तर जिल्ह्यात 241 नवे कोरोना रुग्ण - कोरोना पुणे अपडेट

पुणे विभागातील 4 हजार 799 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 209 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभाग कोरोना
पुणे विभाग कोरोना

By

Published : May 30, 2020, 6:05 PM IST

पुणे -कोरोनाबाधितांची संख्या सर्वत्र वाढत आहे. पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 हजार 364 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 4 हजार 140 आहेत. विभागातील 4 हजार 799 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 209 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

जिल्ह्यात 7 हजार 441 बाधित रुग्ण असून 4 हजार 206 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 2 हजार 913 आहे. कोरोनाबाधित एकूण 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 195 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. 29 मेच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 383ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 241, सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 41, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 68 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील 482 कोरोनाबाधित रुग्ण असून 144 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 321 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 836 कोरोनाबाधित रुग्ण असून 321 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 436 आहे. कोरोनाबाधित एकूण 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 101 रुग्ण असून 55 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 43 आहे. एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 504 कोरोनाबाधित रुग्ण असून 73 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 427 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 85 हजार 723 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 80 हजार 520 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 203 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 71 हजार 41 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 9 हजार 364 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details