पुणे -काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये ताब्यात घेण्याच्या घटनेचा राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून निषेध करण्यात येत आहे. आघाडी सरकारमधील कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेली मारहाण म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीचा लाजिरवाणा नमुना आहे, अशी टीका त्यांनी केली.
'उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेली मारहाण म्हणजे भाजप सरकारच्या दडपशाहीचा नमुना' - पुणे विश्वजित कदम हाथरस घटना निषेध
मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सातत्याने गांधी घराणे आवाज उठवत आहे. त्यांना अटकाव करणे म्हणजे लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यासारखे आहे. सत्तेचा गैरवापर करत असलेल्या भाजपच्या देशामधील आणि उत्तर प्रदेशमधील जुलमी राजसत्तेला जनता आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया विश्वजित कदम यांनी दिली.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेली मारहाण म्हणजे भाजप सरकारच्या दडपशाहीचा नमुना
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही उत्तर प्रदेशमधील दलित आणि मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांना अटकाव करणे म्हणजे लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यासारखे आहे. सत्तेचा गैरवापर करत असलेल्या भाजपच्या देशामधील आणि उत्तर प्रदेशमधील जुलमी राजसत्तेला जनता आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.