महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शरद पवार गुगली टाकण्यात एक्स्पर्ट, मोदी-पवार भेटीवर सुशील कुमार शिंदेंची प्रतिक्रिया - नरेंद्र मोदी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीमध्ये काळजी करण्याचे काही कारण नाही, शरद पवार हे गुगली टाकण्यात एक्स्पर्ट आहे. या भेटीला वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही. महाविकासआघाडी सरकार भक्कम आहे. अशी प्रतिक्रिया सुशील कुमार शिंदे यांनी दिली आहे.

सुशील कुमार शिंदे
सुशील कुमार शिंदे

By

Published : Jul 17, 2021, 9:50 PM IST

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीमध्ये काळजी करण्याचे काही कारण नाही, शरद पवार हे गुगली टाकण्यात एक्स्पर्ट आहे. या भेटीला वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही. महाविकासआघाडी सरकार भक्कम आहे. अशी प्रतिक्रिया सुशील कुमार शिंदे यांनी दिली आहे.

शरद पवार गुगली टाकण्यात एक्स्पर्ट, मोदी-पवार भेटीवर सुशील कुमार शिंदेंची प्रतिक्रिया

'नाना पटोलेंची स्वबळाची भाषा योग्यच'

नाना पटोले यांची स्वबळाची भाषा योग्यच आहे. आम्हालाही आमचा काँग्रेस पक्ष पुन्हा खंबीर करायचा आहे, असेही शिंदे म्हणाले. केंद्राकडून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होतो आहे. हे दूर्दैवं आहे. तसेच, केंद्रात नवे सहकार खाते निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील सहकार चळवळीला कोणताही धोका पोहोचणार नाही, ही चळवळ भक्कम पायावर उभा आहे. असेही सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा -शरद पवारांच्या वरदहस्तामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर - खासदार अमोल कोल्हे

ABOUT THE AUTHOR

...view details