पुणे -कोरोना विषाणू काळात देशात आर्थिक मंदी असताना केंद्र सरकारकडून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात येत आहे. याविरोधात आज (सोमवार) देशभरात सर्वत्र काँग्रेसच्यावतीने आंदोलन केले जात आहे. पुण्यातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अलका चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनात शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर तसेच काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते
देशातील नागरिक दुहेरी संकटात सापडला आहे. त्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे या देशात नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली, याचा निषेध बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.