महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Eknath Shinde : राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यात जंगी स्वागत - Ashadhi Wari 2022

मी या मुख्यमंत्री पदाचा वापर राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी करेल, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी प्रयत्न करेल. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात चांगले दिवस यावे यासाठी माझा प्रयत्न असेल. असे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ( CM Eknath Shinde In Pune )

CM Eknath Shinde In Pune
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यात जंगी स्वागत

By

Published : Jul 9, 2022, 10:17 PM IST

Updated : Jul 9, 2022, 10:30 PM IST

पुणे - मी परत एकदा तुम्हाला भेटण्यासाठी पुण्याला ( CM Eknath Shinde In Pune ) येईल. आपण मला जो प्रेम दाखवलेला आहे, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आपल्या सगळ्या तसेच महाराष्ट्रातील जनतेमुळे मला या राज्यातील नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मी या मुख्यमंत्री पदाचा वापर राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी करेल, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी प्रयत्न करेल. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात चांगले दिवस यावे यासाठी माझा प्रयत्न असेल. असे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पुण्यात जंगी स्वागत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरून विमानाने पुण्यात परतले आहेत. ते आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला मुख्यमंत्री जात असताना हडपसर येथे शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करीन - मी आणि माझ्याबरोबर असलेले 50 आमदार यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे घेऊन चाललो आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे जे हिंदुत्व आहे ते सर्वांना माहीत आहे. या राज्याला प्रगती प्रथावर घेऊन जाण्यासाठी तसेच राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही नक्की करून तसा प्रामाणिक प्रयत्न देखील करू, असे देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्णपणे पाठिंबा - तसेच आज दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा तसेच राष्ट्रपती यांची देखील भेट घेतली. या राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्णपणे पाठिंबा देईल असे देखील श्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिलेला आहे. असे देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

अमरनाथ यात्रेत मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली -अमरनाथ येथे जी घटना घडली आहे. त्यात पुण्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोणीही जल्लोष करू नये. मी तुम्हाला या ठिकाणी भेटण्यासाठी आलो आहे. आपण माझ्यासाठी खूप वेळ थांबले होते. मी आपण सर्वांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मला आषाढी एकादशीनिमित्त वेळेत पोहोचायचे आहे. तुम्ही जो प्रेम मला दाखवले आहे त्यामुळे मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो. यावेळी अमरनाथ यात्रेत जी घटना घडली त्यात पुण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांना यावेळी श्रद्धांजली देखील देण्यात आली.

पुण्यात देखील शिवसेना पक्षाला खिंडार पडली असून आत्ता उघडपणे शिवसैनिक हे एकनाथ शिंदे घटना सहभागी होताना दिसून येत आहे तीन दिवसाआधी हडपसर येथील शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे हे शिंदे गटात सहभागी झाले होते.आत्ता एकनाथ शिंदे बरोबर किरण साळी,अजय भोसले हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले असून येणाऱ्या काळात पुण्यात देखील शिवसेनेत संघर्ष पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा -Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीनिमित्त पंढरी सजली; रविवारी पहाटे मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापुजा

Last Updated : Jul 9, 2022, 10:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details