महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrakant Patil On Sanjay Raut : 'संजय राऊत यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे' - undefined

संजय राऊत ( Sanjay Raut ) हे शरद पवारांनी ( Sharad Pawar ) दिलेल्या अजेंड्यावर काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray ) यांना अडीच वर्षे होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव यांना पदावरून घालवायच आहे आणि सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असे प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी दिली आहे.

Chandrakant Patil Statement On Sanjay Raut
Chandrakant Patil Statement On Sanjay Raut

By

Published : Feb 21, 2022, 4:11 PM IST

Updated : Feb 21, 2022, 6:38 PM IST

पुणे -आम्हाला जे आकलन आहे, त्या आकलनमध्ये संजय राऊत ( Sanjay Raut ) हे शरद पवारांनी ( Sharad Pawar ) दिलेल्या अजेंड्यावर काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray ) यांना अडीच वर्षे होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव यांना पदावरून घालवायच आहे आणि सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असे प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी दिली आहे. हडपसर येथील सातववाडी येथे प्रमोद सातव यांच्या कार्यालयाचे उदघाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील

काय म्हणाले चंद्रकांत पाटील -

तेलंगणचे मुख्यमंत्री मुंबईत आले व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपाविरोधी प्रादेशिक पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा केली. यासंदर्भात विचारले असता, '२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच बिगरभाजपा पक्षांचे महागठबंधन तयार केले होते व आता भाजपाला बहुमत मिळणार नाही, अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या जागा वाढून पक्षाला ३०३ जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही. शिवसेनेला गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७९२ मते मिळाली होती, तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला, असे ते म्हणाले.

हेही वाचा -KCR Maharashtra Visit : 'काँग्रेस शिवाय तिसरी आघाडी शक्य नाही', मंत्री यशोतमी ठाकुरांचा पु्र्नउच्चार

Last Updated : Feb 21, 2022, 6:38 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details