पुणे- पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा अशी उदयनराजेंची इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल, शेवटी ते राजे आहेत. अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर वक्तव्य केले आहे. तर नारायण राणे यांच्या संदर्भात बोलताना राणेंचा विषय इतका मोठा आहे की तो माझ्या ताकदीच्या बाहेरचा विषय आहे. त्याबाबतचा निर्णय घ्यायला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा समर्थ आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला.
युतीच्या जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे घेतील
उदयनराजेंची 'ही' इच्छा असेल तर तेही करू, शेवटी ते राजे आहेत - चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर वक्तव्य केले आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा अशी उदयनराजेंची इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल, शेवटी ते राजे आहेत. अशा शब्दात त्यांनी भोसलेंवर वक्तव्य केले आहेत.
जो जो पक्षात येईल त्या सगळ्याचे स्वागतच आहे. फक्त त्यांच्यावर कुठले गंभीर गु्न्हे दाखल नसावेत, आरोप नसावेत, त्यांना कुठला शब्द दिला जाणार नाही. ज्यांची चर्चा आहे ते सगळे १ सप्टेबरला भाजपात येणार असल्याचेही ते म्हणाले. त्यानंतरही भाजपमध्ये येणारे येतच राहतील. गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात भाजप-शिवसेनेवर लोकांचा विश्वास निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.
आपल्या मतदारसंघात विकास व्हावा, आपले अजेंडे पूर्ण व्हावेत या अपेक्षेने लोक भाजपमध्ये येतात. त्यांचे स्वागत असून त्यांचे राजीनामे वगैरे अशा तांत्रिक बाबी लक्षात घेऊन त्यांचा प्रवेश होतील असे पाटील म्हणाले.