झोपडीत राहणाऱ्या नागरिकाला तुम्ही क्वारंटाईन व्हायला लावता, सगळे नियम त्यांनीच पाळायचे का?
वाधवान कुटुंबीयांना अशाप्रकारे परवानगी देणे म्हणजे महाराष्ट्राशी कोलेला द्रोह आहे. वाधवान सारख्या येस बँकेतील प्रमुख गुन्हेगाराला पाच गाड्यांसह बाहेर फिरायला परवानगी मिळते कशी? अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पुणे -वाधवान कुटुंबीयांना अशाप्रकारे परवानगी देणे म्हणजे महाराष्ट्राशी केलेला द्रोह आहे. या एका घटनेने होम क्वारंटाईन, तोंडाला मास्क लावणे, असे शब्द पाण्यात गेले आहेत. कारण झोपडीत राहणाऱ्या नागरिकाला तुम्ही क्वारंटाईन व्हायला लावता. सगळे नियम त्यांनीच पाळायचे का? वाधवान सारखा येस बँकेतील प्रमुख गुन्हेगाराला पाच गाड्यांसह बाहेर फिरायला परवानगी मिळते. गृहमंत्री सचिवावर ढकलून मोकळे झाले. सचिव तुमचे ऐकत नाही का? त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला जमत नसेल तर गृहमंत्र्यानी राजीनामा द्यावा.