महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चाकण आंदोलनाची कारवाई पारदर्शक व्हावी- अजित पवार

चाकण येथे मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात काही समाजकंटकांनी चाकण पोलीस ठाण्याला लक्ष करत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण केली होती. या प्रकरणी १०८ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

चाकण आंदोलनाची कारवाई पारदर्शक व्हावी- अजित पवार,

By

Published : Jul 18, 2019, 6:34 PM IST

पुणे - शहरानजीक असणाऱ्या चाकण औद्योगिक नगरीत गेल्या वर्षी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांनी मोर्चा काढला होता. 30 जुलैला झालेल्या या मोर्चाने अचानक हिंसक वळण घेतले होते. या प्रकरणी पोलिसांनी १०८ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त आर.के.पदमनाभन यांनी दिली आहे.

चाकण आंदोलनाची कारवाई पारदर्शक व्हावी- अजित पवार

गेल्या वर्षी 30 जुलैला झालेल्या मोर्चाने अचानक हिंसक वळण घेतले होते. यात पोलीस स्टेशवर देखील हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आत्तापर्यंत दोन हजार आंदोलकांची चौकशी झाली आहे. पोलीस स्टेशनवर हल्ला करणाऱ्या 108 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव समोर येत असून, त्याबाबत देखील तपास सुरू आहे. अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिलीय आहे.दरम्यान या प्रकरणी अजित पवार यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी, "मोहितेंवर चाकण पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचा संशय आहे. पण कोणालाही टार्गेट न करता, ही कारवाई पारदर्शकपणे व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे." असे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details