पुणे - केंद्र सरकारची राज्य सरकारकडे किती रुपयांची थकबाकी आहे याचा हिशोब काढला तर राज्य सरकारची पंचाईत होईल, असा निशाणा ( Raosaheb Danve Criticise State Government ) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Central Minister of State Raosaheb Danve ) यांनी राज्य सरकारवर साधला. राज्य सरकार सतत जीएसटीच्या पैशावरुन केंद्रावर टीका करत असते. मी स्वतः कोळसामंत्री आहे. राज्य सरकारकडे कोळशाचे तब्बल तीन हजार कोटी रुपये थकीत आहेत. आम्ही याबाबत कधी विचारणा केली का, कोळसा पुरवठा थांबवला का, असा सवाल उपस्थित करत दानवे म्हणाले, ज्या पद्धतीने जीएसटीचा परवाना देण्यात येतो त्या पद्धतीने समप्रमाणात सर्व राज्यांना देण्यात येईल.
आज वाईन विकत आहेत, उद्या बीअर अन् दारू विकतील -राज्यसरकारने वाईनबाबत घेतलेल्या निर्णयावर विरोधी पक्षाच्यावतीने राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) म्हणाले, वाईन आणि दारु यामध्ये फरक आहे. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते म्हणाले, वाईन आणि दारू या दोन्हीमध्ये अल्कोहोल असते. राज्य सरकार किराणा दुकान व सुपर मार्केटमधून आज वाईन विकत ( Wine At Supermarket ) आहे. उद्या बीअर आणि दारूही विकतील. आमच्या काळात आम्ही काही जिल्हे दारूमुक्त केले होते. या सरकारने त्या जिल्ह्यातील दारुबंदी उठवली.