पुणे -100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआय अॅक्टिव्ह झाली असून याप्रकरणात मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुण्यातील घरावर सीबीआयने धाड टाकली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास सीबीआयने ही धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुली प्रकरणात आरोप करताना संजय पाटील यांच्यासोबत असलेले व्हाट्सअॅप चॅटिंग पुरावे म्हणून जोडले होते. आणि याच प्रकरणात ही कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शंभर कोटी वसुली प्रकरणातील प्रमुख संशयित असलेला सचिन वाझे अंटेलीया स्फोटकाप्रकरणी सध्या अटकेत आहे. तर याच काळात सचिन पाटील हे मुंबई पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून काम करत होते. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या संपर्कात हे दोघेही होते. पोलीस आयुक्त पदावरून पायउतार होताच परमवीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटी रुपये वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात त्यांनी संजय पाटील यांच्यासोबत केलेले व्हाट्सअॅप चॅटिंग देखील उघड केले होते.
संजय पाटील यांच्या पुण्यातील घरी धाड