महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हॉटेलमधील आचारी कामगाराचा वडज धरणाच्या कालव्यात आढळला मृतदेह - दुर्घटना

मागील दोन दिवसांपासुन जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असुन ओढे, नाले, कँनल पाण्याने दुथडी भरुन वाहत आहेत. आज कॅनलमध्ये हॉटेलमध्ये आचारी म्हणुन काम करणाऱ्या संजय पवार या व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला.

हॉटेलमध्ये आचारी कामगाराचा वडज धरणाच्या कालव्यात आढळला मृतदेह

By

Published : Jul 27, 2019, 11:18 PM IST

पुणे - जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी हद्दीत वडज धरण कालव्यात दुपारच्या समुारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. परिसरातील तरुण आणि ग्रामस्थानी हा मृतदेह बाहेर काढला. मृत व्यक्तीचे नाव संजय पवार असून ते भोर तालुक्यातील रहिवासी आहे.

हॉटेलमध्ये आचारी कामगाराचा वडज धरणाच्या कालव्यात आढळला मृतदेह

संजय पवार निमगाव येथे एका हॉटेल व्यवसायिकाकडे आचारी म्हणून काम करत होते. चार दिवस आजारपणामुळे ते कामावर गेले नव्हते. गेल्या दोन दिवसांपासुन जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असुन ओढे, नाले, कॅनल पाण्याने दुथडी भरुन वाहत आहेत. आज कँनलमध्ये हॉटेलमध्ये आचारी म्हणुन काम करणाऱ्या संजय पवार या व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला. त्यांना आत्महत्या केली की पाण्यात पडुन दुर्घटना घडली. या तपास जुन्नर पोलीस स्टेशन करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details