पुणे- 2024 ला दिल्लीतील चित्र हे संपूर्णपणे बदलेल असेल आणि हे मी तुम्हाला खात्रीशिरपणे सांगत आहे, असे स्पष्ट मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर या देशातील कोणतीही आघाडी ही काँग्रेसला सोडून होणार नाही. काँग्रेस हा या देशातील प्रमुख विरोधीपक्ष आहे. काही राज्यात त्यांची सरकार नसेल किंवा काही राज्यात ते कमकुवत असले तरी देशभरात रुजलेला हा पक्ष आहे. बाकी सगळे हे प्रादेशिक पक्ष आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
भाजप हा मोठा पक्ष पण 2024 ला सत्तेतून सहजासहजी जाणार
भाजप हा मोठा पक्ष आहे, असे त्यांचेच लोक बोलत असतात. हा पक्ष जो या देशावर राज्य करत आहे. तो सहजासहजी जरी या देशातून सत्तेवरून गेला, तरी त्यांचे अस्तित्व राहणारच आहे. जसे महाराष्ट्रात 105 आमदार आहेत पण, राज्यात त्यांची सत्ता नाही. पक्षाची ताकद विधानसभेपेक्षा बाहेर दाखवतात, असा टोलाही यावेळी राऊत यांनी लगावला.
अजून एक इंटरव्हल नवाब मलिक दाखवणार
आमच्या काळात काही सिनेमांचा कालावधी मोठा असायचा आणि त्यात दोन इंटरव्हल असायचे. त्यामुळे नवाब मलिक यांनी सांगितल्या प्रमाणे हा पहिला इंटरव्हल झाला. पण, अजून एक इंटरव्हल नवाब मलिक हे करणार आहे, असेही यावेळी राऊत म्हणाले.
अजित पवार यांच्या बहिणी व खासदार भावना गवळी मराठी नाहीत का..?
या महाराष्ट्रात सगळेच लोक हे मराठी आहेत. क्रांती रेडकर एक मराठी अभिनेत्री आहे. त्यांचे पती एनसीबीत अधिकारी आहे. हे जे काही महाराष्ट्रात चित्र दिसत आहे ते व्यक्तिगत नाही. एनसीबीचा एक अधिकारी ज्याने काहीतरी चूक केली आहे. काही पुरावेही समोर आले आहेत. त्यांच्याविरोधात चाललेली ही लढाई आहे. ते काही क्रांती रेडकर विरोधातील वयक्तिक लढाई नाही. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात येणे आणि आमच्या लोकांचा छळ करणे, आमच्या राज्याला बदनाम करणे, आमच्या मंत्र्यांच्या घरावर छापे टाकतील तसेच भावना गवळी हे मराठी नाही का..?, अजित पवार यांच्या बहिणीही मराठी नाही का याच्या विरोधात कोणी आवाज उठवत नाही. या राज्यात सगळेच मराठी असून त्यांचे रक्षण करणे प्रतिष्ठा सांभाळणे या सरकारचा काम आहे. आम्ही ते करत आहोत, असे राऊत म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांचा विषय अत्यंत महत्त्वाचा
एसटी कर्मचाऱ्यांचा विषय हा खूप महत्त्वाचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचा विषयही अधिक महत्त्वाचा आहे. कालही एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. प्राधान्याने त्यावर निर्णय घेतला पाहिजे. आर्यन खानसाठी मोठ-मोठे लोक पूढे आले. कोणीतरी या एसटी कर्मचाऱ्यांसाठी वकिली केली पाहिजे, ती मी करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री हे संवेदनशील आहे. त्यांनी त्या प्रकरणात लक्ष घातला आहे, असे खासदार राऊत म्हणाले.
पोलिसांना जास्त सुविधा मिळ्यावात
पोलिसांना 800 रुपये बोनस देण्यात आले त्याबाबत अर्थमंत्री आणि गृहमंत्री यांनी उत्तर द्यावे. मला असे वाटते की पोलिसांना बोनस जास्त मिळाला पाहिजे. पोलिसांना जास्त सुविधा मिळाव्यात या राज्यतील पोलीस दलाने कोरोनाकाळात आपले बलिदान दिले आहे. त्यांचा विचार व्हायला पाहिजे हे कोणालाही वाटेल, असेही यावेळी राऊत म्हणाले.
हे ही वाचा -पुण्यात महापौरांसह भाजपा पदाधिकाऱ्यांची संघटित गुंडगिरी - राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप