महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुढील वाटचाल काय? भाजपकडून लढा... हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांकडून वदवले भाजपचे नाव - congress leader patil

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना निवडणुकीत काय भूमिका घ्यावी यावर प्रश्व विचारला. त्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करत भाजप प्रवेश करा आणि कमळ चिन्हावर उभे रहा, असे म्हटले. त्यामुळे पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याची चिन्हे दिसत आहेत.

कार्यकर्ता मेळाव्यात नारेबाजी

By

Published : Sep 4, 2019, 7:38 PM IST

Updated : Sep 4, 2019, 8:17 PM IST

पुणे- पुढील राजकीय वाटचाल काय करावी तुम्हीच सांगा, असा प्रश्न काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना विचारला. मेळाव्यातील कार्यकर्त्यांनी एकच गलका करत भाजपकडून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. त्यामुळे आता काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील भाजपवासी होण्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर?

हेही वाचा न - 'मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही', उदयनराजेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

दरम्यान, आगामी काळात काय रणनीती असावी यादृष्टीने त्यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून आगामी रणनीती ठरवण्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी हा प्रश्न विचारला असता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळे हर्षवर्धन पाटील देखील लवकरच भाजपवासी होण्याचे चित्र आहे. अद्याप तरी कुठलाही निर्णय त्यांनी जाहीर केलेला नाही. येत्या 10 सप्टेंबरला आपण आपला निर्णय जाहीर करू करू, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Last Updated : Sep 4, 2019, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details