महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrakant Patil criticize shivsena सावरकरांवर जहरी टीका झाल्यावरही शिवसेना रिअ‍ॅक्ट झाल्याचे दिसत नाही - चंद्रकांत पाटील - pankaja munde

शिवसेना पक्ष (shivsena) भाजपपासून दूर गेल्यानंतर आमचे हिंदुत्व कमी झालेले नाही. सावरकरांवर जेव्हा जेव्हा टीका (comment on savarkar) झाली तेव्हा आम्ही आवाज उठवली आहे. सावरकरांवर जहरी टीका झाल्यावर देखील शिवसेना रिअ‍ॅक्ट झाल्याचे दिसत नाही. त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला ट्विट देखील केलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil criticize shivsena) यांनी दिली.

Chandrakant Patil criticize shivsena
सावरकर टीका चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया

By

Published : Nov 21, 2021, 10:03 PM IST

पुणे -शिवसेना पक्ष (shivsena) भाजपपासून दूर गेल्यानंतरआमचे हिंदुत्व कमी झालेले नाही. सावरकरांवर जेव्हा जेव्हा टीका (comment on savarkar) झाली तेव्हा आम्ही आवाज उठवली आहे. सावरकरांवर जहरी टीका झाल्यावर देखील शिवसेना रिअ‍ॅक्ट झालेली दिसत नाही. त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला ट्विट देखील केलेला नाही. काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा लांगूलचालनाची आहे आणि त्यांच्याबरोबर सरकार चालवायचे म्हणजे सेनेला तसे चालावे लागणार, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil criticize shivsena) यांनी केली.

प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

हेही वाचा -पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन; रक्तदान करून आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली

जे पक्षावर रिअ‍ॅक्ट होत नाही त्यांना भविष्यात चांगले पद मिळते

विनोद तावडे (Vinod Tawde national general secretary) यांचे अभिनंदन करतो. त्यांचे अभिनंदन हे मी वैयक्तिक पातळीवर करतो. कारण ते आणि मी विद्यार्थी चळवळीपासून एकत्र आहोत. विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती मिळणे हे त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांचे उत्तर आहे. जे पक्षावर निष्ठा आणि पक्षावर रिअ‍ॅक्ट होत नाही त्यांना भविष्यात चांगले पद मिळत असते. याचे मोठे उदाहरण आताच चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालेले तिकीट आहे, पंकजा मुंडे यांना मिळालेले राष्ट्रीय पद आणि विनोद तावडे यांना देखील आता मिळालेले पद आहे, असे देखील यावेळी चंद्रकांत पाटील (bjp state president Chandrakant Patil) म्हणाले.

पुढे संधी मिळेल, खूप स्कोप आहे

पंकजा मुंडे (pankaja munde) या आमच्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्या आहेत आणि त्या पक्षाच्या दर महिना दोन महिन्याला होणाऱ्या बैठकीला नेहेमी उपस्थित असतात. विनोद तावडे देखील प्रभारी आहेत. पंकजाताई आणि विनोद तावडे यांना येणाऱ्या काळात संधी मिळेल, वर्षभरात खूप स्कोप आहे, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा -पुणे पोलिसांची ई-तक्रारींकडे पाठ; 32 पोलीस ठाण्यात तब्बल 287 तक्रारी प्रलंबित

ABOUT THE AUTHOR

...view details