महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pravin Darekar About Rajya Sabha Seat : यावेळीही तिसरी जागा भाजपाच निवडून येणार; प्रवीण दरेकरांचा दावा

सहाव्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आज निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवस आहे मात्र अद्याप दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार कायम ठेवले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात सहाव्या जागेसाठी निवडणूक घेण्याची शक्यता आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी असे सांगितले आहे की, मागील वर्षीप्रमाणेच यावेळीही भाजपाचे तीन उमेदवार राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. त्यामुळे आम्ही उमेदवार दिला आहे. ( Pravin Darekar About Rajya Sabha Seat )

Pravin Darekar About Rajya Sabha Seat
प्रवीण दरेकर

By

Published : Jun 3, 2022, 5:40 PM IST

पुणे - राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. सहाव्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आज निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवस आहे मात्र अद्याप दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार कायम ठेवले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात सहाव्या जागेसाठी निवडणूक घेण्याची शक्यता आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी असे सांगितले आहे की, मागील वर्षीप्रमाणेच यावेळीही भाजपाचे तीन उमेदवार राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. त्यामुळे आम्ही उमेदवार दिला आहे. ( Pravin Darekar About Rajya Sabha Seat )

प्रवीण दरेकरांचा दावा

आघाडीच्या नेत्यांची भाजपासोबत बैठक - विशेष म्हणजे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष घरी भेट घेतली होती. यात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा देखील केली होती. मात्र ही चर्चा यशस्वी झाली नाही असे वाटते आहे. त्यामुळे आता राज्यात राज्यसभेची निवडणूक अटळ आहे. यावर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीकडे मतांची जुळवा जुळवी होत नाही म्हणून ते साशंका आहे हे यातून स्पष्ट आहे. गेल्या वेळेस भाजपने तीन खासदार निवडून आणले होते आणि याही वेळेस आम्ही तिसरी जागा निवडूण आणणार आहोत, या आत्मविश्वासानेच आम्ही तिसरा उमेदवार दिलेला आहे. असे यावेळी दरेकर यांनी सांगितले आहे. पुण्यात भारतीय जनता पक्ष कार्यालयात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आले होते. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा -Nana Patole : "गांधी परिवाराला हात लावाल तर..."; नाना पटोलेंचा भाजपाला इशारा

मी निषेध व्यक्त करतो -राज्यात राज्यसभेची निवडणूक होणार आहे आणि जर झाली तर घोडेबाजार होईल असे संजय राऊत म्हणाले होते. यावर दरेकर म्हणाले की, आमदार ही काही विकाऊ बाजाराची वस्तू नाहीये. आमदार हा 3 लाख लोकांचे नेतृत्व करत असतो. अश्या प्रकारे लोकप्रतिनिधीला घोडेबाजारात उभे करणे हा आमदारांचा अपमान आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. आमदार हा प्रगल्भ असतो त्याला काय करावे हे त्याला माहित असते. असे देखील यावेळी दरेकर म्हणाले.

हेही वाचा -पुण्यात धक्कादायक प्रकार; हॉटेल चालकाने उकळते पाणी टाकून तीन भिकाऱ्यांचा केला निर्दयी खून

हेही वाचा -तुझे लग्न दुसरीकडे होऊच देणार नाही! 40 वर्षीय प्रेयसीच्या धमकीने हताश प्रियकराची आत्महत्या

हेही वाचा -Minister Vijay Vadettiwar : सरसंघचालकांच्या भूमिकेचे स्वागत, परंतु त्यांनी ठाम राहावे - विजय वडेट्टीवार

ABOUT THE AUTHOR

...view details