पुणे - पुण्यासह राज्यभरात एनआयए कडून छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)च्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात दोन दिवसांपुर्वी पॉप्युलर फ्रंटच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधासह, पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. ( Popular Front of India Protests in Pune ) या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणता व्हायरल झाला. तसा सर्वच स्तारातून संताप व्यक्त होऊ लागला. या आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करू लागले. मनसे प्रमुख यांनीही ट्विट करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही संस्था, भाजप तसेच शहरातील सुमारे 27 सामाजिक संस्थांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.
दोन दिवसांत कठोर पाऊल उचलणार - कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे, देशाच्या विविध भागांत अंतर्गत जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडविण्याच्या या जमावाचा उद्देश असल्याचे स्पष्ट होते. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या सर्व कार्यकत्यांवर तातडीने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्या संघटनेवर बंदी घालावी. तसेच, कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील यावेळी मुळीक यांनी केली आहे. यावेळी पोलीस आयुक्तांना आम्ही जी मागणी केली आहे. त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत कठोर पाऊल उचलून त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करतील असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले असल्याचे यावेळी मुळीक म्हणाले आहेत.