नवी दिल्ली / पुणे - एल्गार परिषद संदर्भात संशयित हनी बाबू यांच्या नोएडा येथील राहत्या घरी पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी पोलिसांनी हनी बाबू यांच्या घराची फक्त झडती घेतली आहे. एल्गार परिषद प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा... शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत; विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता
1 जानेवारी 2018 रोजी पुण्यालगतच्या भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या हिंसाचारामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पुणे आणि नोएडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक असलेले हनी बाबू यांच्या निवासस्थानी छापा टाकला आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी हा छापा टाकला आहे.